मनसे आक्रमक; असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांची संतप्त प्रतिक्रिया

यावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) हे ऋतुसारखे रंग बदलत असल्याची टीका त्यांनी केली होती.

Avinash Jadhav And Asaduddin (Photo Credit: Facebook)

मनसेच्या (MNS) पहिल्या राज्यव्यापी अधिवेशानात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा झेंड्याचे अनावरण केले आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) हे ऋतुसारखे रंग बदलत असल्याची टीका त्यांनी केली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएमआयएम यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या विधानावर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रंग बदलणे आणि कानाखालचा रंग बदलणे काय असते हे ओवेसींना महाराष्ट्रातच आल्यानंतर कळेल, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी ओवेसींवर बोचरी टीका केली आहे.

असुदुद्दीन ओवेसी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत राज ठाकरे ऋतुसारखे रंग बदलत आहे. त्यामुळे ते आता रंगबदलू हिंदुत्वादी झाले असल्याची जहरी टीका राज ठाकरेंवर त्यांनी केली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या या टिकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, अविनाश जाधव म्हणाले की, ओवेसींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, तर त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला प्रसिद्धी मिळते. त्याचा भाग म्हणून ते राज ठाकरेंवर टीका करत असावेत. रंग बदलणे आणि कानाखालचा रंग बदलणे हे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल. यांच्या पुढे पुन्हा ओवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली, तर महाराष्ट्रात त्यांच्या पतंगीची कन्नी मनसे सैनिकच कापेल एवढे नक्की", असे अविनाथ जाधव म्हणाले आहेत. हे देखील वाचा-'महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी बोलणे अडचणीचे ठरेल' मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून इम्तियाज जलील यांना इशारा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही एक व्हिडिओ शेअर करत एमआयएमचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला होता. एन्टरटेनर कोणाला म्हणता असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत राज ठाकरे यांच्या नादाला लागू नका. हवे असल्यास आबू आझमीला जाऊन विचारा असा सांगत बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif