Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी सोडतीपूर्वी वेबिनारचे आयोजन, गृहनिर्माण संस्थेकडून 'अधिकृत संकेतस्थळ'च वापरण्याचा सल्ला; कारणही घ्या जाणून
त्यासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, म्हाडाच्या युनिटने १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता थेट वेबिनारचे आयोजन केले.
Mhada Lottery 2024: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, (Mhada) मुंबईमध्ये २०२३ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, म्हाडाच्या युनिटने 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी १२ वाजता थेट वेबिनारचे आयोजन केले. या वेबिनारमध्ये म्हाडाकडून ''आमचीच अधिकृत वेबसाईट वापरा असा' सल्ला देण्यात आला. (हेही वाचा- म्हाडा गृहनिर्माण लॉटरी घोटाळा, बनावट वेबसाईट द्वारे अर्जदारांना फसवणाऱ्या दोघांना अटक)
हा वेबिनार त्यांच्या आगामी गृहनिर्माण लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे अर्जदारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने केला आहे. हा उपक्रम सर्व सहभागींसाठी केला आहे. अर्जदार त्यांचे अर्ज म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे सबमिट करू शकतात असे सांगितले.
म्हाडाच्या अर्जदारांना कोणत्याही शंकाचे निराकरण करण्यासाठी आणि अर्जदारांना सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार पार पडला. या वेबिनारमध्ये म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचा तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेल यांनी यानी सोडत अर्ज प्रकियेविषयी माहिती दिली. तसेच इच्छुक अर्जदारांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली.
विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय सोजत प्रणाली तयार करण्यात आळी. सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.