Condoms Found In Samosas: पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये समोस्यांमध्ये सापडले कंडोम, दगड, तंबाखू आणि गुटखा; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहवालानुसार, 27 मार्च रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत एकाला अटक केली आहे.
Condoms Found In Samosas: पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये दिल्या जाणाऱ्या समोस्यांमध्ये (Samosas) कंडोम (Condoms), दगड (Stones), तंबाखू (Tobacco), गुटखा (Gutkha) आणि इतर अनेक गोष्टी आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा एका स्थानिक दैनिकाने केला आहे. अहवालानुसार, 27 मार्च रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत एकाला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, चौकशीत उघड झाले आहे की, एका व्यावसायिकाने कंपनीसोबतचा स्वतःचा करार संपुष्टात आणल्यानंतर नवीन कंत्राटदाराकडून केटरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हे भयावह कृत्य घडवून आणले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. चिखली येथील एका कंपनीचे अधिकारी कीर्तीकुमार शंकरराव देसाई यांनी 7 मार्च 2024 पोलिसांत तक्रार दाखल केली. चिखली पोलिस ठाण्यात दिलेल्या या तक्रारीत त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या कंपनीला चिखलीतील दुसऱ्या एका मोठ्या कंपनीकडून अन्न पुरवठ्याची ऑर्डर मिळाली आहे. या आदेशात कीर्तीकुमार यांनी समोस्यांच्या पुरवठ्यासाठी एसआरएस एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीसोबत करार केला. (हेही वाचा - Sion Guru Kripa Owner passes away: समोसा साठी प्रसिद्ध सायनच्या गुरू कृपा हॉटेलचे मालक विशिनदास वाधवा यांचे निधन)
राही शेख असे एसआरएस कंपनीच्या मालकाचे नाव आहे. कीर्तिकुमार यांच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी जखमांवर लावायची मलमपट्टी एसआरएस कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या समोशांमध्ये आढळून आली. ही तक्रार आल्यानंतर कीर्तीकुमारच्या कंपनीने रहीम खानच्या कंपनी SRS सोबतचा करार संपुष्टात आणला आणि पुण्यातील मनोहर एंटरप्रायझेस या दुसऱ्या कंपनीला समोसे पुरवण्याचे आदेश दिले. एसआरएसचे मालक रहीम खान हे पाहून संतापले. त्याने त्याचे साथीदार अजहर शेख आणि मजार शेख यांच्यासोबत मोठा कट रचला. (हेही वाचा - पुणे: Inox, PVR, Cinepolis मध्ये समोसे मिळणार नाहीत; अन्न व सुरक्षा प्रशासनाचे आदेश)
27 मार्च 2024 रोजी रहीम खानने आपल्या कामगारांना कंडोम, गुटखा आणि दगड टाकून समोसे भरण्याचे आदेश दिले. रहिमने हे समोसे सकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान चिखलीतील त्याच कंपनीत वाटले, जिथे त्याचा करार संपणार होता. याबाबत कंपनी कर्मचाऱ्यांनी तक्रार केली असता कीर्तीकुमार यांनी 3 मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रहीम शेख, फिरोज शेख, विकी शेख, अझर शेख आणि मजार शेख यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
तथापी, या सर्वांवर भादंवि कलम 328,120बी आणि 34 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)