Condoms on Swiggy Instamart: स्विगी इंस्टामार्टद्वारे 'कंडोम' ऑर्डर करण्यात मुंबई अव्वल; सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
30 दशलक्ष ऑर्डर्स अॅपवर दुधासाठी देण्यात आल्या होत्या. बेंगळुरूने सोया आणि ओट मिल्क सारख्या बहुतेक डेअरी गोष्टींची ऑर्डर दिली.
मुंबईमध्ये (Mumbai) कंडोमची (Condoms) मागणी वाढली आहे. मुंबईतील ग्राहकांनी स्विगी इंस्टामार्टवर (Swiggy Instamart) गेल्या 12 महिन्यांत मागील वर्षाच्या तुलनेत 570 पटीने अधिक कंडोम मागवले आहेत. मेट्रो शहरांमध्ये 10 मिनिटांत किराणा मालाची डिलिव्हरी सेवा लोकप्रिय झाली आहे, त्यामुळे लोक त्यावरून मोठ्या प्रमाणावर कंडोम मागवत आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने ही बाब उघड केले आहे. सध्या अॅपवर अंडी, कंडोम, सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पन्सना जास्तीत जास्त ऑर्डर मिळत असल्याने, क्विक-कॉमर्स सेवा इंस्टामार्टची गेल्या एका वर्षात 16 पट वाढ झाली आहे.
या अॅपचे सर्वाधिक वापरकर्ते मेट्रो शहरांमध्ये आहेत. बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई इथे हे अॅप सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या शहरांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, मासिक पाळीचे कप आणि टॅम्पन्स (गेल्या वर्षी सुमारे दोन दशलक्ष युनिट्स ऑर्डर करण्यात आले होते) आणि बँड-एड्स (45,000 बॉक्स) यांसारख्या वस्तूंसाठी जास्तीत जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये, या शहरांमध्ये आईस्क्रीमची मागणी 42 टक्क्यांनी वाढली आणि बहुतेक ऑर्डर रात्री 10 वाजल्यानंतर देण्यात आल्या.
इंस्टामार्टने सांगितले की, ग्राहकांनी झटपट नूडल्सची 5.6 दशलक्ष पॅकेट्सची खरेदी केली. या उन्हाळ्याच्या महिन्यांत हैदराबादच्या तापमानाने सर्वकालीन उच्चांक गाठल्यामुळे, वापरकर्त्यांनी सुमारे 27,000+ ताज्या रसाच्या बाटल्या ऑर्डर केल्या. गेल्या दोन वर्षांत मागणी वाढलेले आणखी एक उत्पादन म्हणजे अंडी. अंड्यांची 50 दशलक्ष ऑर्डर देण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूने गेल्या वर्षभरात सरासरी 6 दशलक्ष अंड्यांची ऑर्डर दिली आहे. (हेही वाचा: How Condoms Are Made? जाणून घ्या Sex करताना उपयोगी ठरणारे 'कंडोम्स' नक्की कसे बनवले जातात (Watch Video)
नाश्त्याच्या वेळी, बंगळुरू आणि हैदराबादमधील ग्राहकांनी बहुतेक अंडी ऑर्डर केली आहेत. 30 दशलक्ष ऑर्डर्स अॅपवर दुधासाठी देण्यात आल्या होत्या. बेंगळुरूने सोया आणि ओट मिल्क सारख्या बहुतेक डेअरी गोष्टींची ऑर्डर दिली. विशेष म्हणजे, मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये रात्रीच्या जेवणादरम्यान पोहे आणि उपमाचे रेडी-टू-इट पॅकेट्स सर्वाधिक ऑर्डर केले गेले. स्विगीने सांगितले की, गेल्या एका वर्षात स्क्रब पॅड, बाथरूम क्लीनर, ड्रेन क्लीनर आणि इतरांसाठी 2 लाखांहून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.