शुल्लक वादातून चाकण एमआयडीसीत कंपनी मालकाची दगडाने ठेचून हत्या

हरिश्चंद्र किसन देटे (वय, 45) असे या खून झालेल्या मालकाचे नाव आहे. चाकण एमआयडीसीतील 'व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप' या कंपनीत ही घटना धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी जीवन डोंगरे, शरद धुळे, अश्विन कांबळे आणि त्यांच्या दोन ते तीन साथीदारांना अटक केली आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

चाकण (Chakan) एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका कंपनीत मालकाची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. हरिश्चंद्र किसन देटे (वय, 45) असे या खून झालेल्या मालकाचे नाव आहे. चाकण एमआयडीसीतील 'व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप' (VHD Engineering Workshop) या कंपनीत ही घटना धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी जीवन डोंगरे, शरद धुळे, अश्विन कांबळे आणि त्यांच्या दोन ते तीन साथीदारांना अटक केली आहे.

व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक हरिश्चंद्र देटे आणि आरोपी यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे आरोपींनी रागाच्या भरात सोमवारी दुपारी हरिश्चंद्र यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी जीवन याने हरिश्चंद्र यांच्या डोक्यात दगड घातला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या आहेत. (हेही वाचा - Shemaroo आपल्या नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' वापरू शकते - मुंबई उच्च न्यायालय)

हरिश्चंद्र यांची चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. सोमवारी हरिश्चंद्र नेहमीप्रमाणे आपल्या कंपनीत आले होते. मात्र, हरिश्चंद्र यांचा कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आलेल्या काही जणांसोबत वाद झाला. या वादात हरिश्चंद्र यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हरिशचंद्र यांची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली. हरिश्चंद्र यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारापूर्वीचं हरिश्चंद्र यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगतिलं.