Mumbai Marine Drive: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात पडलेल्या महिलेला जीवदान (Watch Video)
मरिन ड्राइव्हवर एक धक्कादायक घटना घडली. मुंबई पोलिस देवदूत सारखे धावून आले आणि त्यांंनी पाण्यात बुडणाऱ्या महिलेला वाचवले आहे.
Mumbai Marine Drive: पावसात समुद्राच्या ठिकाणी फिरणे हे धोकादायक ठरू शकते अश्याच दोन वेगवेगळ्या घटना मुंबईत गुरुवारी घटना घडल्या. मरिन ड्राइव्हवर फिरण्यासाठी आलेली महिला पाण्यात बुडली.या घटनेनंतर मुंबई पोलिस देवदूत सारखे धावून आले आणि त्यांंनी पाण्यात बुडणाऱ्या महिलेला वाचवले आहे. मरिन ड्राइव्हवर उपस्थित असलेल्या कर्तृत्ववान दोन पोलिसांनी वृध्द महिलेचे प्राण वाचवले आहे. महिलेचा पाय घसरून खाली पडली होती. समुद्रात लाटा खळवळल्या होत्या. परिस्थिती हातातून बाहेर जाणार होती. नागरिकांनी आरडाओरड करत पोलिसांना बोलावून घेतले. (हेही वाचा- बाल्कनीच्या छतावर पडलेल्या बाळाला जीवदान, काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल)
मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती कनानी असं महिलेचे नाव आहे. मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी स्वाती आल्या होत्या. मरिन ड्राईव्हच्या कट्टावरून त्यांची पर्स खाली पडली होती. पर्स उचलण्यासाठी प्रयत्न करत असताना तीचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडली. ही घटना दुपारी २.४५ च्या सुमारास घडली. महिला खाली पडताच, नागरिकांनी आणि महिलेने आरडाओरड सुरु केला. पाच मिनिटांच सीपीआरचे दोन पोलिस अधिकारी घटनास्थळी आले. त्यासोबत पोलिस व्हॅन देखील घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि महिलेला बाहेर काढले.
उपस्थित नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. महिलेला तात्काळ पोलिसांनी जीटी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. किरण ठाकरे आणि अनोल दहिफळे या पोलिसांनी काहीच न विचार करता पाण्यात उडी मारून महिलेला वाचवले. गेट वे ऑफ इंडिया येथे देखील तीन तरुणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.