Mumbai Airport Cocaine Smuggling: पोटात लपवलं 11.39 कोटी रुपयांचे कोकेन; आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक

पोलिसांनी हे कॅप्सूल जप्त केले आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे, DRI ने विमानतळावरच या संशयिताला थांबवले. त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एक्स-रे आणि स्कॅनमध्ये त्याच्या पोटात अनेक कॅप्सूल गिळल्याचे आढळले.

Mumbai Airport Cocaine Smuggling: पोटात लपवलं 11.39 कोटी रुपयांचे कोकेन; आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक
Mumbai Airport Cocaine Smuggling | ANI

Mumbai Airport Cocaine Smuggling: महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) मोठे यश मिळाले आहे. आफ्रिकन देश आयव्हरी कोस्ट येथील एका नागरिकाला कोकेन तस्करी (Cocaine Smuggling) च्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपी सिएरा लिओनहून भारतात आला होता. आरोपीने त्याच्या पोटात चक्क 67 कोकेनचे कॅप्सूल लपवले होते. पोलिसांनी हे कॅप्सूल जप्त केले आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे, DRI ने विमानतळावरच या संशयिताला थांबवले. त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एक्स-रे आणि स्कॅनमध्ये त्याच्या पोटात अनेक कॅप्सूल गिळल्याचे आढळले. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेद्वारे 68 कॅप्सूल काढण्यात आले, ज्यामध्ये एकूण 1139 ग्रॅम कोकेन आढळले.

मुंबई विमानतळावर कोकेन तस्करीचा पर्दाफाश -

प्राप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे 11.39 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. शरीरात एवढ्या मोठ्या प्रमाणात लपवून ड्रग्ज आणणे केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायक देखील आहे. तथापी, तपासात असे दिसून आले आहे की ही व्यक्ती एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा भाग आहे, जी भारताचा वापर ड्रग्जसाठी एक नवीन बाजारपेठ म्हणून करत आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये ड्रग्जची मागणी पाहून, तस्कर वेगवेगळ्या मार्गांनी भारतात ड्रग्ज आणत आहेत. (हेही वाचा - Sex Racket Busted in Mumbai: मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 बांगलादेशी महिलांची सुटका, 8 आरोपींना अटक)

आरोपींची चौकशी सुरू -

तथापी कोकेन तस्कराच्या मुळाशी पोहोचण्यासाठी डीआरआय टीम आरोपींची कसून चौकशी करत आहे. आरोपी भारतातील स्थानिक एजंटला भेटणार होता का? किंवा त्याचे कोणतेही जुने नेटवर्क येथे आधीच सक्रिय आहे का? याचा तपास आता डीआरआय टीम करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 07:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).