Ganeshotsav 2020: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना अन् आपल्या सर्वांना शक्ती मिळो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!
Ganeshotsav 2020: दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतो आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
Ganeshotsav 2020: दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतो आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत. यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा - Ganeshotsav 2020: मुंबईमध्ये होणार सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी; तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती)
दरम्यान, संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनदेखील उद्धव ठाकरे यांनी केले.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतोय. मात्र, यावेळेस आपल्यासमोर #COVID_19 चे विघ्न. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, या साथीचा मुकाबला करण्यासाठी #कोविड_योद्धा यांच्यासह सर्वांना शक्ती मिळो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा pic.twitter.com/9gYVBbe62D
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 21, 2020
श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे, त्यांचे अभिनंदन. गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा. तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचे होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2020 07:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

