महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत; पहा टीझर
त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांना विशेष मुलाखत दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता वर्षपूर्ती 28 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे त्यांच्या मागील वर्षभराच्या काळातील अनुभवाबद्दल प्रश्न विचारले आहेत. दरम्यान त्या मुलाखतीचा पहिला टीझर आज (26 नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये कोरोना संकट, महाविकास आघाडी मधील बिघाडी, भाजपाच्या सातत्यानं सरकार पाडण्याच्या धमक्या याविषयी रोखठोक प्रश्न विचारण्यात आले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला कशी आणि नेमकी काय उत्तरं देणार? यासाठी ही मुलाखत उद्या (27 नोव्हेंबर) दिवशी सामनाच्या युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे.
सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्याचा पहिला टीझर आज ट्वीटर अकाऊंट द्वारा शेअर केला आहे. त्याचं कॅप्शन 'ऊद्या.. Tomorrow...धमाका..' असं दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुलाखत प्रोमो
महाराष्ट्र राज्यांत मागील वर्षी सउमारी दीड महिन्यांच्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीने एकत्र येऊन सत्ता प्रस्थापित केली होती. राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यानंतर परस्पर विरोधी विचारसरणीचे हे 3 पक्ष फार दिवस एकत्र राहणार नाहीत. सहा महिन्यात हे सरकार पडेल, असं भाजपकडून बोललं जात होतं. आतादेखील 3-4 महिन्यात सरकार पडेल असे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने भविष्यवाणी केली आहे. या सार्यावर उद्धव ठाकरे काय बोलातात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. Raosaheb Danve: अगामी तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडणार, अन् भाजपचे सरकार येणार; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खळबळजनक दावा.
दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदा आणि कोरोना संकटाच्या काळात एकदा अशा मागील वर्षभरात 2 महत्त्वाच्या मुलाखती संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घेतल्या होत्या.