CM Uddhav Thackeray Live Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेला संबोधणार; काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष
यात कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्री काय महत्त्वाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) महाराष्ट्राभोवतीचा विळखा कुठे सैल होताना दिसत असल्याची संकेत मिळत असतानाचा अचानक हा विळखा घट्ट होऊ लागला. मागील 2-3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना अचानक रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंतेत टाकणारी आहे. या सर्वावर सविस्तर बोलण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रात्री 8 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या (Video Conference) माध्यमातून जनतेला संबोधणार आहेत. यात कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्री काय महत्त्वाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज रात्री 8 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. यात देशात अनेक राज्यांत सुरु झालेली संचारबंदी पाहता मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत काय निर्णय घेतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.हेदेखील वाचा- नाशिक मध्ये पुन्हा संंचारबंदी? सोशल मीडीया मध्ये जुन्या बातम्यांचे स्क्रीन शॉर्ट शेअर करत अफवांंचे पेव
कोरोना व्हायरसवर अजून तरी यशस्वी लस आली नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याचे सत्र सुरुच आहे. त्यातच आता उद्यापासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता मुख्यमंत्री काय महत्त्वाचे निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर उद्या राज्यात काय चित्र दिसेल हे ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी होणारा आजचा संवाद फार महत्त्वाचा मानला जात आहे.