IPL Auction 2025 Live

CM Uddhav Thackeray is Back: 'उपस्थिती आभासी असली तरी पाठिंबा आभासी असणार नाहीट', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

या कार्यक्रमाला त्यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शवली. 'ही उपस्थिती आभासी पद्धतीने असली तरी सरकार म्हणून माझा पाठिंबा मात्र आभासी नसेल', असा टोला मुख्यमंत्र्यांनी या वेळी विरोधकांना लगावला.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजरोहण आणि त्यानंतर शिवाजी पार्कात उपस्थिती लावली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या (Nirbhaya Pathak) थीम गाण्याचेही त्यांनी अनावरन केले. या कार्यक्रमाला त्यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शवली. 'ही उपस्थिती आभासी पद्धतीने असली तरी सरकार म्हणून माझा पाठिंबा मात्र आभासी नसेल', असा टोला मुख्यमंत्र्यांनी या वेळी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना मुंबई पोलिसांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाबद्दल कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कौतुक वाटावं असं काम आपण करतो आहोत. या कामाबद्दल मी मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो. एका बाजूला जगभरात महिला प्रगतीपथावर आहेत. त्यांची घोडदौड सुरु आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महिला असहाय्यही आहेत. एखादी घटना घडते. काही दिवस गोंधळ होतो. पुढे लगेच परिस्थितीत जैसे थे आणि शांत होऊन जाते. पण, अशा काही घटना घडूच नयेत आणि जर घडल्याच तर गुन्हेगारांचा बंदोबस्त तातडीने करणारी यंत्रणा आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करतो आहोत, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Aaditya Thackeray on CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'Back in Action': आदित्य ठाकरे)

ट्विट

विरोधकांना टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले, कार्यक्रमात या वेळी मी दोन तीन वेळा आभासी उपस्थिती असा उल्लेख ऐकला. माझी उपस्थिती आभासी असली तरी माझा पाठिंबा आभासी असणार नाही. पाठिंबा हा प्रत्यक्षच असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पाठिमागील अनेक दिवसांपासून आभासी मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.