IPL Auction 2025 Live

CM Uddhav Thackeray Interview: पोटदुखी हे सुद्धा कोरोना व्हायरस संसर्गाचे लक्षण असू शकेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

सामनाचे संपादक, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

CM Uddhav Thackeray Interview: मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही न फिरता चांगले काम करु शकतो. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली असू शकते. खरं तर पोटदुखी हे कोरोनाचं (Coranavirus) लक्षण असू शकतं. कारण कोरोना व्हायरसची लक्षणं वेगवेगीळी आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दै. सामनाचे संपादक, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोरोना व्हायरस संकटात आवश्यक सल्ला आणि उपाययोजना आम्ही मागितल्या होता. परंतू, 'त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात', असा टोलाही ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Interview: मंत्रालयात कमी गेलो या आरोपात दम नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

याच मुलाखतीत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक कोणती तरी मान्यवर संस्था आहे. खरं म्हणजे ती मी आजून पाहिलीही नाही. पण, त्या संस्थेनेही देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. विरोधकांसाठी हे सुद्धा एक पोटदुखीचे कारण असू शकेल. कारण करोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत, असा चिमटाही उद्धव यांनी मुलाखतीदरम्यान काढला.