मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा उद्या होणार विस्तार, 36 मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता

तर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर एक महिना उलटून गेला आहे. पण अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Uddhav Thackeray. (File Photo: IANS)

महाराष्ट्रात अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मिळाल्यानंतर महाविकासआघडीची सत्ता स्थापन झाली आहे. तर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर एक महिना उलटून गेला आहे. पण अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तर आता उद्या (30 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात होणार आहे. पण या शपथविधीवेळी महाविकासआघाडी मधील 36 मंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्रीमंडळाच्या विस्तार कधी होणार याची सर्वजण वाट पाहत होते. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच महाविकासआघडीतील काही नेत्यांना खातेवाटप करण्यात आले. एवढेच नाही तर मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी घेतली त्यावेळी अन्य 7 जणांनी सुद्धा शपथ घेतली होती. मात्र आता उद्या पार पडणाऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी अजून 36 जण शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शपशविधीवेळी शिवसेनेचे 13 मंत्री, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी 12 मंत्री असणार आहेत.(अजित पवार यांनी सांगितली महाविकास आघाडी च्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख)

त्यामुळे शपथविधी सोहळ्यात कोणाला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार आणि कोणते खाते दिले जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच महाविकासआघाडीतील काही नेत्यांची नावे आघाडीवर असून त्याबाबत कोणतीही अधिकृत महिती देण्यात आलेली नाही.  त्यानुसार गुलाबराव पाटील. अब्दुल सत्तार, अजित पवार, अनिल गोटे आणि यशोमती ठाकूर, के. सी. पाढवी यांच्यासह अन्य काही जणांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते.