Shiv Sena Meeting: शिवसेना आमदार, खासदार बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आगामी काळात शिवसेना गावागावापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवले जाईल, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) आमदार, खासदर, जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले. आगामी काळात शिवसंपर्क अभियान राबवा आणि शिवसेना गावागवापर्यंत पोहोचवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक घेतली आहे. त्यामुळे या बैठकीस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ही पॉवरफूल्ल बैठक (Shiv Sena Powerful Meeting) असल्याचेही म्हटले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांच्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त नाही.

या बैठकीनंतर शिवसेना नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आगामी काळात शिवसेना गावागावापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवले जाईल, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत.आगामी काळात राज्यात महापालिका, नगरपंचायती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने चांगले यश मिळवले. त्यानंतर आता आगामी काळात पार पडणाऱ्या निवडणुकांतही मोठे यश मीळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांतून वृत्त, शिवसेना खासदार राऊत म्हणाले 'मला कल्पना नाही')

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात या बैठकीत विशेष चर्चा झाल्याचे वृत्त अद्यापतरी पुढे आले नाही. मात्र,टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चर्चेत असलेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

राठोड यांच्या राजीनाम्याबाबत (leader Sanjay Rathore resign) शिवसेनेच्या गोटातून पूष्टी होऊ शकली नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यासमोर विचारले असता राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याबाबत मला कल्पना नाही असे म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी मात्र सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.