CM Uddhav Thackeray Celebrate New Year with Mumbai Police: कितीही आदळआपट करु दे मुंबई पोलिसांच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुकोद्गार

तुमच्यावर कामाचा ताण असतो. तुम्ही सातत्याने तणावात असता. म्हणूनच नव्या वर्षाची सुरवात माज्या बहाद्दर कुटुंबीयांच्या सोबत करण्यासाठी मी इथे आलो आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यंदा नववर्षाचे स्वागत मुंबई पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन केले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोरोना काळत केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच, मुंबई पोलिसांवर अनेकांनी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. परंतू, कोणी कितीही आदळआपट केली तरीही तुमच्या कर्तृत्वाला डाग लागणार नाही. याची मला खात्री आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची कौतुक केले. तसेच, तुम्ही नेहमी दक्ष असता. पूर्णपणे जबाबदारी घेता म्हणूनच आम्ही आमच्या कुटुंबासोबत उत्साहाने सण उत्सव साजरे करु शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज मी केवळ मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबतील एक सदस्य म्हणून आलो आहे. तुमच्यावर कामाचा ताण असतो. तुम्ही सातत्याने तणावात असता. म्हणूनच नव्या वर्षाची सुरवात माज्या बहाद्दर कुटुंबीयांच्या सोबत करण्यासाठी मी इथे आलो आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील समस्त नागरिकांतर्फे नववर्षाच्या शुभेच्छा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही 2021 या नववर्षाचे स्वागत महाराष्ट्र पोलिसांसोबत साजरे केले. त्यासाठी अनिल देशमुख पुणे पोलीस नियंत्रण कक्ष विभागात गेले. या वेळी देशमुख यांनी स्वत: नागरिकांच्या तक्रारींचे फोन कॉल स्वीकारले आणि पुणेकरांना एक सुखद धक्का दिला 'हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय' हा आवाज ऐकून काही काळ पुणेकरांनाही आपल्या कानावर विश्वास बसला नाही. (हेही वाचा, Sanjay Raut Tweets to Amit Shah: संजय राऊत यांचा इशारा 'आता बस्स!; आरोप सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा')

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांसोबत केकही कापला आणि नववर्षाचे स्वागत केले. या वेळी गृहमत्री म्हणाले की, कोरोना व्हायरस संकट काळात पोलिसांवर विशेष ताण होता. या काळात आपण खूप काम केले. तुम्ही नक्कीच थकला आहात. परंतू, तरीही आपण मोठ्या हिमतीने काम केले. या पुढचा काळही एकत्र राहू. एकत्र राहून लढाई लढू. महाराष्ट्र कोरोनामुक्त करु, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी पोलिसांना साद घातली आणि भक्कम विश्वासही दिला.