Amit Shah यांच्या भेटीसाठी CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर
राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा असे या दौऱ्याचे कारण देण्यात आले असले तरी त्या पलीकडे या दौऱ्यामागे आणखी काही कारण आहेका? याबात उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आजच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अद्याप तरी अधिकृत माहिती आली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे आज (4 जून) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. या दौऱ्यात ते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याचे समजते. राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा असे या दौऱ्याचे कारण देण्यात आले असले तरी त्या पलीकडे या दौऱ्यामागे आणखी काही कारण आहेका? याबात उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आजच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अद्याप तरी अधिकृत माहिती आली नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर. त्यामुळे हे दोन्ही नेते दिल्लीसाठी एकत्र रवाना होणार आहेत की वेगवेगळे याबाबतही निश्चित माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार. महाविकासआघाडीकडून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेली मोर्चेबांधणी या सगळ्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. बोलले जात आहे की, राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातही नाराजीचा सूर आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने आता तरी मंत्रिमंडळ विस्तार करावा, असी सत्ताधारी वर्गात दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यावरही केंद्रीय नेतृत्वाचे काय म्हणने आहे याबाबत या भेटी कानोसा घेतला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. (हेही वाचा, Pankaja Munde at Gopinath Gad: 'मिळायचा त्यांना इशारा मिळतोच, सर्वांना बोलावून भूमिका घेईन- पंकजा मुंडे)
राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांची युती झाली असली तरी महाविकासआघाडी सक्षम पर्याय देण्याच्या तयारीत आहे. महाविकासआघाडी जर एकत्र जोमाने लढली तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका एकत्रच लढायच्या यावर मविआमध्ये एकमत आहे. हे जर एकमत असेच राहिले तर भाजपला आव्हान मिळू शकते. त्यादृष्टीनेही भाजपची मोठी रणनिती सध्या सुरु असल्याचे समजते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)