Ganesh Chaturthi 2023: देशभरात आज गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!#गणेशोत्सव२०२३ pic.twitter.com/5YW24MLF0Z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 18, 2023
राज्यातील जनतेला श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा! भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन आहे.
श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची,… pic.twitter.com/x3FgAxTO6T
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 19, 2023
You are the source of happiness, You are the cure for sorrow.
You are the creator and the one who lets us create.
Morya Morya, Mangalmurti Morya…
May Lord Ganesha bless everyone with prosperity and happiness!
Happy Ganesh Chaturthi to everyone in Maharashtra and across the globe… pic.twitter.com/j3acbk5NOu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2023
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणेशाच्या कृपेने हे वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो, विघ्नहर्ता राज्यातील सर्व विघ्न दूर करो ही मनोकामना! pic.twitter.com/5Cj92XWwqj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 19, 2023
आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. चैतन्याने सळसळणारा गणेशोत्सव, आपण सर्वजण या उत्सवात सहभागी होऊन आनंदाची उधळण करुया. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.#GaneshChaturthi2023 #Ganeshotsav2023 pic.twitter.com/7Q2CoT7dZP
— Supriya Sule (@supriya_sule) September 19, 2023
गणेश चतुर्थी तथा गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
हे विघ्नहर्त्या गणराया, माझ्या बळीराजाचा सुखकर्ता होऊन नैसर्गिक संकटाच्या छायेतून समृद्धीकडे घेऊन जा, ही प्रार्थना...
गणपती बप्पा मोरया!#GaneshChaturthi pic.twitter.com/36OrUpHzHJ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)