महाराष्ट्र: दिल्लीहून शिर्डीला येणारे Spicejet SG946 चे विमान धावपट्टीवरुन घसरले; प्रवाशी सुखरुप
शिर्डी विमानतळावर उतरणारे स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरुन घसरल्याची घटना समोर येत आहे.
शिर्डी (Shirdi) विमानतळावर उतरणारे स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरुन घसरल्याची घटना समोर येत आहे. स्पाईसजेट कंपनीचे SG946 हे विमान दिल्लीहून शिर्डीला येत होते. शिर्डी विमानतळावर विमानाचे लँडिंग होताना विमान घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विमानात एकूण 120 प्रवाशी असून सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
ANI ट्विट:
पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी विमानाजवळ जाऊन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेनंतर शिर्डी विमानतळावरील धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.