Mumbai Shocker: फटाके फोडण्यावरून दोन गटात हाणामारी; मुंबईतील अँटॉप हिल येथे 20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

Mumbai Shocker:  मध्य मुंबईत शुक्रवारी पहाटे फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका 20 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली. अँटॉप हिल (Antop Hill) परिसरात झालेल्या या गुन्हेगारी घटनेत विवेक गुप्ता यांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोकरी आगर येथील जय महाराष्ट्र नगर येथे एका अरुंद गल्लीत रहिवाशांचा एक गट फटाके फोडत असताना दोन गटात हाणामारी सुरू झाली. आरोपी कार्तिक आर मोहन देवेंद्र, जो दुचाकीवरून जात होता, त्याने फटाके फोडणाऱ्या एका गटाला निर्जन ठिकाणी जाण्यास सांगितले. मात्र, त्याला गटातील काही सदस्यांनी मारहाण केली. त्यानंतर देवेंद्र तेथून निघून गेला. (हेही वाचा -Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकीवर हल्ला करण्यापुर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात केला होता सराव)

दरम्यान, काही वेळाने देवेंद्र त्याची पत्नी, भाऊ आणि आणखी काही लोकांसह लाकडी काठ्या आणि क्रिकेटच्या बॅट घेऊन गल्लीत परतले. दोन्ही गटांमध्ये काही वेळातच जोरदार बाचाबाची झाली. या गोंधळात फटाके फोडणाऱ्यांपैकी एकाने चाकू बाहेर काढला. हाणामारी सुरू असतानाच त्याच्या हातातून शस्त्र निसटून जमिनीवर पडले. देवेंद्रसोबत आलेल्या राज पुट्टीने धारदार शस्त्र उचलले आणि गुप्ता यांच्यावर वारंवार वार केले. (हेही वाचा --  Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ )

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातचं पोलिस घटनास्थळी पोहोचले. गुप्ता यांना नागरी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विक्की मुत्तू देवेंद्र, मिनिअप्पन रवी देवेंद्र आणि कार्तिकची पत्नी अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आणखी आरोपींचा शोध घेत आहेत.

तथापी, अँटॉप हिल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत खून आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल केला असून चौकशीनंतर पाच जणांना अटक केली आहे. पोलीस परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजच्या मदतीने अतिरिक्त आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif