Coronavirus: मुंबई विमानतळावरील CISF चे 11 जवान COVID-19 पॉझिटीव्ह, BMC कर्मचाऱ्यालाही कोरोना व्हायरस बाधा
या चारही जवानांची COVID19 चाचणी पॉझिटीव्ह आली होती. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जवान आणि इमारत सील करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळ (Mumbai Airport) येथे कर्तव्य बजावत असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोना व्हायरस लागण झाल्याचे पुढे आले आहे. या 11 जवानांची COVID19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कोरोना व्हायरस बाधित जवानांच्या संपर्कात आलेल्या 142 जवानांना आता अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या विद्युत विभाग (BMC Electricity Department) कर्मचाऱ्यालाही कोरोना व्हायरस बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्याला 2 एप्रिल या दिवशी कोरोना व्हायरसच चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
पनवेल येथे राहणाऱ्या CISF च्या 4 जवानांना कोरोना व्हायरस लागण झाल्याचे कालच निष्पन्न झाले होते. या चारही जवानांची COVID19 चाचणी पॉझिटीव्ह आली होती. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जवान आणि इमारत सील करण्यात आली आहे.
एएनआय ट्विट
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही कोरोना व्हायरस बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्याला 2 एप्रिल या दिवशी कोरोना व्हायरसच चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या कर्मचाऱ्याला अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा कर्मचारी 2 एप्रिल ते पुढील 14 दिवस अलगिकरण कक्षात राहणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) बस जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमण झाले आहे की नाही? पाचच मिनिटात कळणार; रॅपिड टेस्टसाठी राज्याला केंद्राची परवानगी)
एएनआय ट्विट
राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा विळखा आता अधिकच वाढताना दिसत आहे. अर्थात राज्य सरकार कोरोनाचे संकट शक्य तितके नियंत्रणात ठेवण्याचा कसोशिने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत राज्याच्या शहरी भागात असलेले कोरोना व्हायरस संकट आता राज्यातील ग्रामीण भागातही पसरले आहे. शहरांसोबतच आता राज्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत.