CIDCO Lottery 2026: तळोजा, कळंबोली, खारघर मध्ये 4779 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; cidcohomes.com वर नोंदणी सुरू

सिडको होम्स च्या लॉटरी मध्ये सर्वाधिक घरे असलेल्या तळोजा येथील घराची किंमत सर्वात कमी, म्हणजे २३.५० लाख रुपये आहे. कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत ३७.७० लाख रुपये असून, खारघर बस डेपो येथील घराची किंमत सर्वाधिक, म्हणजे ४३.५० लाख रुपये आहे.

CIDCO Homes In Navi Mumbai

नवी मुंबई मध्ये हक्काचं घर घेणार्‍यांसाठी सिडकोने मोठी घोषणा केली आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO) ने नवी मुंबईतील तळोजा, कळंबोली आणि खारघर येथील एकूण 4779 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. या घरांसाठी शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली.

सिडकोची नवी मुंबईत घरं किती?

सिडकोच्या  योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे सर्वाधिक ४,२२९ सदनिका उपलब्ध आहेत. याशिवाय कळंबोली बस डेपो परिसरात २५७ आणि खारघर बस डेपो परिसरात २९३ सदनिका देण्यात येणार आहेत. या योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सिडकोच्या घरांच्या किंमती किती

सिडकोने या घरांच्या विक्रीसाठी आपली वेबसाइट अद्ययावत केली असून, तिन्ही ठिकाणच्या घरांच्या किंमतीतही फरक आहे. सर्वाधिक घरे असलेल्या तळोजा येथील घराची किंमत सर्वात कमी, म्हणजे २३.५० लाख रुपये आहे. कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत ३७.७० लाख रुपये असून, खारघर बस डेपो येथील घराची किंमत सर्वाधिक, म्हणजे ४३.५० लाख रुपये आहे. खारघर येथील घराचे क्षेत्रफळ ३२२ चौरस फूट इतके आहे.

सिडकोच्या घरांसाठी कोण करू शकतो अर्ज?

सिडकोच्या या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे, ही प्रमुख अट आहे. सविस्तर पात्रता निकष आणि इतर अटी-शर्ती सिडकोच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: CIDCO Lottery 2026: 'माय प्रिफर्ड सिडको होम' साठी अर्ज करताना 'ही' कागदपत्रे ठरणार अनिवार्य .

दळणवळणाच्या दृष्टीने फायदेशीर ठिकाणे

तळोजा, कळंबोली आणि खारघर ही तिन्ही ठिकाणे रस्त्यांचे व्यापक जाळे, रेल्वे व मेट्रो सुविधा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तम दळणवळणाने जोडलेली आहेत. त्यामुळे या भागांतील रहिवाशांना शहरातील प्रमुख निवासी, व्यावसायिक आणि वाहतूक केंद्रांपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरणार आहे.

वाटप प्रक्रिया कशी असेल

सदनिकांचे वाटप पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि योजनेच्या अटी-शर्तींची पूर्तता झाल्यानंतरच केले जाईल. वाटप संगणकीकृत लॉटरी पद्धतीने पार पडेल. अद्ययावत आणि सविस्तर माहितीसाठी इच्छुक अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळाला, म्हणजेच www.cidcohomes.com ला भेट द्यावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement