Christmas-New Year: ..तर ख्रिसमस, नव वर्षांच्या पार्ट्यांमध्ये फिल्मी, गैरफिल्मी गाणी वाजवता येणार नाहीत: उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ आदींमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष स्वागत पार्ट्यांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांसाठी फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या आवश्यक आहेत.

Christmas-New Year Party | Representation Image | (Photo Credits: Pixabay)

Christmas-New Year: ख्रिसमस आणि नववर्ष 2020 (New Year2020) चे स्वागत विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ आदींमध्ये डीजेवर गाणी लाऊन मद्यधुंद पार्ट्यांचे आयोजन करुन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ख्रसमस आणि नववर्षांनिमित्त पार्ट्यांचे आयोजन करण्याबाबत काही नियम आणि अटींची पूर्तता करण्याचे आदेश सोमवारी (23 डिसेंबर 2019) दिले आहेत. हे आदेश ख्रिसमस, नववर्ष स्वागत करण्यासाठी पार्टीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना लागू असतील. उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानुसार, ख्रिसमस (Christmas 2019) , नववर्ष स्वागतानिमित्त विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या मद्यधुंद पर्ट्यांमध्ये वाजविण्यात येणारी फिल्मी आणि गैरफिल्मी गाण्यांबाबत फोनोग्राफिक परफॉर्मन्स (Phonographic Performance Ltd) या संस्थेकडून परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या घेणे आवश्यक आहे. हा परवाना आणि कॉपीराईट परवानग्या नसतील तर, अशी गाणी पार्ट्यांमध्ये वाजवता येणार नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ आदींमध्ये ख्रिसमस आणि नववर्ष स्वागत पार्ट्यांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांसाठी फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या आवश्यक आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी त्यासाठीचे परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड’ची (PPL) परवानगी घेणे आवश्यक आहे.

काय आहे फोनोग्राफिक परफॉर्मन्स?

विविध भाषांतील चित्रपट आणि गाण्यांचे स्वामित्व हक्क असलेली संस्था म्हणजे फोनोग्राफिक परफॉर्मन्स. सुमारे 78 वर्षांपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात 1941 मध्ये फोनोग्राफिक परफॉर्मन्स (पीपीए) या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेकडे विविध भाषांतील सुमारे 25 लाख चित्रपट आणि त्यातील गाण्यांचे स्वामित्व हक्क आहेत. दरम्यान, स्वामित्व हक्क कायद्याचा आधार पीपीए संस्थेने उच्च न्यायालयाकडे दाद मागत आरोप केला होता की, हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे स्वामित्व हक्क असलेली गाणी विनापरवाना वाजवण्यात येतात. मुळात विविध पार्ट्यांमध्ये संस्थेची परवानगी घेणे आणि गाणी वाजवण्याचे परवाना शुल्क देणे गरजेचे आहे. (हेही वाचा, Christmas Cake Ideas: यंदा नाताळला नेहमीच्या रम केक सोबतच Dates ते Honey Cake च्या हटके रेसिपीज घरच्या घरी ट्राय करून द्विगुणित करा ख्रिसमसचा आनंद! (Watch Video))

पीटीआय ट्विट

दरम्यान, पीपीए संस्थेची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे स्वामित्व हक्क असलेली चित्रपट आणि अन्य गाणी वाजवताना संस्थेची परवानगी घेण्यात यावी असे आदेशच उच्च न्यायालयाने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पबमालक आणि पार्टीच्या आयोजकांना दिले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now