Chinese Battery Exploded in Nagpur: चायनीज बॅटरीचा स्फोट, नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी; नागपूर येथील घटना

ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात सावनेर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात घडली. चिराग प्रवीण पाटील असे जखमी मुलाचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो आणि रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्वार्टरमध्ये कुटुंबासह राहतो.

explode | Representative image (Photo Credit- Pixabay)

खेळताना चायनीज बॅटरीचा स्फोट (Chinese Battery Exploded in Nagpur) होऊन नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात सावनेर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात घडली. चिराग प्रवीण पाटील असे जखमी मुलाचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो आणि रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्वार्टरमध्ये कुटुंबासह राहतो. चायनीज बॅटरी (Chinese Battery) स्फोटात जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटना घडली तेव्हा चिराग हा चीयनीज बॅटरीला कागद बांधून त्याचा पंख्यासारखा वापर करत हवा घेण्याचा खेळ खेळत होता. त्याने कागदाच्या तुकड्यांचा वापर करून बॅटरीला चक्र जोडले आणि पंख्यासारखे फिरवायला सुरुवात केली. जेव्हा त्याने तात्पुरता पंखा त्याच्या चेहऱ्याजवळ आणला तेव्हा बॅटरीमध्ये स्फोट झाला आणि तो गंभीर जखमी झाला.

स्फोटामुळे चिरागच्या कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले जेथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. चिराग याच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif