Chinchwad By Election 2023: चिंचवड पोटनिवडणूकीत वंचित चा पाठिंबा अपक्ष उमेदवार Rahul Kalate यांना; मविआ ची धाकधूक वाढली

27 फेब्रुवारीला त्यासाठी मतदान होणार असून 2 मार्चला निवडणूक निकाल आहे.

Vanchit Supports Rahul Kalate | Twitter

चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये (Chinchawad Byelection) तिरंगी लढत होणार असल्याने या निवडणूकीत चुरस अधिक वाढणार आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विरूद्ध मविआ चे नाना काटे (Nana Kate) विरूद्ध बंडखोरी करत एनसीपीचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित कडून प्रसिद्धपत्र जारी करत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता चिंचवड निवडणूकीमध्ये मविआ च्या टेंशन मध्ये अजून वाढ झाली आहे.

दरम्यान राहुल कलाटे हे 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्येही उभे होते. त्यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळेस 1 लाख 12 हजार मतं त्यांनी घेतली होती. राहुल कलाटे तेव्हाचे शिवसेनेचे सभागृह नेते होते त्यावेळेस ही जागा शिवसेनेने लढून कलाटेंना उमेदवारी द्यावी असा वंचितचा आग्रह देखील होता पण तसे झाले नसल्याचे वंचितने प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.

वंचितने पूर्ण विचार करून राहुल कलाटेंना आपला पाठिंबा दिला आहे. मागील काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये गौप्यस्फोटांमुळे काही गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे चिंचवड मध्ये भाजपाला कुणी रोखू शकत असेल तर ते राहुल कलाटे आहेत आणि त्यामुळेच त्यांना आपण पाठिंबा देत असल्याचं वंचितने स्पष्ट केले आहे.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. 26 फेब्रुवारीला त्यासाठी मतदान होणार असून 2 मार्चला निवडणूक निकाल आहे.