ठाकरे सरकारने दिले राज्य खड्डेमुक्त करण्याचे आदेश; जागतिक बँकेकडून घेणार कर्ज

ठाकरे सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 10 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी आणलेल्या 'हायब्रिड अ‍ॅन्युईटी' पद्धतीनुसार रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच आतापर्यंत ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत अशा रस्त्यांची कामेही सुरू करण्यात येणार आहेत. या कामांसाठी जागतिक बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही यावेळी ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray (PC- Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, असा आदेश दिला आहे. ठाकरे सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 10 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी आणलेल्या 'हायब्रिड अ‍ॅन्युईटी' पद्धतीनुसार रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच आतापर्यंत ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत अशा रस्त्यांची कामेही सुरू करण्यात येणार आहेत. या कामांसाठी जागतिक बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही यावेळी ठाकरेंनी केली. (हेही वाचा -  Maharashtra Public Holiday 2020 list: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर)

मुंबई महापालिकेने खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा, अशी योजना सुरू केली आहे. मागील सरकारनेही राज्य खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही. परंतु, आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी ठाकरेंनी रस्त्यांच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी सूचना दिली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी राज्यात सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पाचा आढावा घेतला.

हेही वाचा - 'महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती लागणार असून लवकरच महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येणार'- सुधीर मुनगंटीवार

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीला विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आमदार अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, सी. पी. जोशी, सचिव अजित सगणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.