मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर उपस्थित
त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे.
Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे. यातच महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटूंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर उपस्थित झाले आहेत. बाळासाहेबांचा स्मृतिदिन यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी शिवाजी पार्कावर मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यंदा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आपल्या सहकुटुंबासोबत शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. हे देखील वाचा- Balasaheb Thackeray Death Anniversary: 'संयुक्त महाराष्ट्राची स्थापना' बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे विधान
दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्मारकावरुन संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र, अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही?,” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटर माध्यमातून विचारला राज्य सरकारला विचारला आहे.