मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत कार्यालयीन वेळांपासून भविष्यातील वाटचालीबाबत केली चर्चा
भविष्यातील राज्याची वाटचाल आणि राज्यातील विकासकामे यांवरही बैठकीत चर्चा झाली.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा लढा अद्याप संपलेला नाही. कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी पारंपारिक कार्यालयीन 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणं गरजेचे आहे अशी बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत बोलून दाखवली. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज निती आयोगाची बैठक झाली. त्यात ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणली. त्याचबरोबर भविष्यातील राज्याची वाटचाल आणि राज्यातील विकासकामे यांवरही बैठकीत चर्चा झाली.
कार्यालयीन वेळांमध्येही आता बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई लोकल सुरु केल्यानंतर सर्वसामान्यां लोकल प्रवास करण्यासाठी काही वेळा ठरवून दिल्या होत्या. त्यावेळी कामकाजाची वेळ बदलण्यासाठी राज्य सरकारनं सर्व कार्यालयांना विनंती आणि आवाहन केलं होतं. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता 10 ते 5 या कार्यालयीन वेळेचे नियोजन करुन ते वेगवेगळे ठेवण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.हेदेखील वाचा- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीमध्ये करोना, लॉकडाउनबरोबरच देशभरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळेस आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी केली.
नीती आयोगाच्या बैठकीत बोलताना राज्यात कोरोना काळात झालेल्या विकासकामांसदर्भातही भाष्य केलं. राज्यावरील करोना संकटावर मात काढत आम्ही मार्ग काढण्यासाठी लढत होतो. आम्ही करोनाचे संकटाकडे संधी म्हणून पाहत वाटचाल करत आहोत. राज्यावरील करोना संकटावर मात काढत आम्ही मार्ग काढण्यासाठी लढत होतो. आम्ही करोनाचे संकटाकडे संधी म्हणून पाहत वाटचाल करत आहोत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आम्ही तंत्रज्ञानावर खूप भर दिला असून इंटरनेटची सेवा राज्यातील सर्व गावांमध्ये पोहचवण्याचे आमचा उद्देश आहे, असंही उद्धव ठाकरेंनी या बैठकीत बोलताना सांगितलं.