Maharashtra Temples Reopen: महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे आजपासून उघडली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे केले आवाहन
ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळे (Religious Places) पुन्हा उघडण्याचा महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील कोरोनाच्या (Coronavirus) परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळे (Religious Places) पुन्हा उघडण्याचा महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे आजपासून (7 ऑक्टोबर) उघडण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबईतील मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला सुरक्षित राहून आणि कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Navratri 2021: शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिरात तुळशीची पानं, झेंडू, जरबेरा सह आकर्षक फुलांची आरास (पहा फोटोज)
ट्वीट-
सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.