Husband Wife Relationship: पहिली गेली दुसरी केली, पहिली पुन्हा आली दुसरीला हाकलली; पती आणि सवती विरोधात पीडितेची पोलिसांत तक्रार
त्यामुळे ती आता परत येणार आहे. तू येथून निघून जा. फिर्यादीने आरोपी शेख उजेर शेख अमीन यास विरोध केला. मात्र, त्याने पहिल्या पत्नीला ठेऊन घेतले आणि फिर्यादीला घरातून हाकलून दिले.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: तोंडी तलाक अथवा घटस्फोट देऊन महिलांची फसवणूक करण्याचा किंवा वेटीस धरण्याचा प्रकार पुढे आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या शेख उजेर शेख अमीन (रा. फाजलपूरा) नामक विवाहीत इसमाने आपल्या पहिल्या पत्नीला तलाक दिला. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला काही दिवस नीट नांदवले. मात्र, अचानक एक दिवस शेख उजेर शेख अमीन याची नियत फिरली. त्याने दुसऱ्या पत्नीला माहेरहून एक लाख रुपये आण असे म्हणत तिचा छळ सुरु केला. दरम्यान, त्याची पहिली पत्नी परत आली. पहिली पत्नी परत येताच त्याने दुसऱ्या पत्नीला घरातून हाकलवून दिले. या प्रकरामुळे व्यथीत झालेल्या पीडितने (दुसऱ्या पत्नीने) शहरातील सीटीचौक पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनसार, शेख उजेर शेख अमीन (रा. फाजलपूरा) याचा विवाह समाजातीलच एका तरुणीसोबत झाला होता. काही दिवस तिच्यासोबत संसार केल्यानंतर त्याने तिला म्हणजेच पहिल्या पत्नीला रतसर तलाक दिला. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. दुसरे लग्न करताना आरोपीने दुसऱ्या पत्नीला पहिला विवाह आणि तलाकबद्दल पूर्ण माहिती दिली होती. त्यानंतरच दोघांनी विवाह केला. नव्याने सुरु झालेला संसार निट सुरु असताना अचानक पती शेख उजेर शेख अमीन याने फिर्यादी महिलेला म्हणजेच दुसऱ्या पत्नीला पैशांसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. आपण हिमायत बाग येथे घर येथे घर बांधत आहोत. त्यासाठी माहेरी जाऊन पैसे घेऊन ये, अशी मागणी तो करु लागला. त्यानंतर त्याने तिला मारहाणही केली आणि छळही सुरु केला.
दरम्यान, एक दिवस अचानक शेख उजेर शेख अमीन याने फिर्यादीला सांगितले की, आपली पहिल्या पत्नीसोबत तडजोड झाली आहे. त्यामुळे ती आता परत येणार आहे. तू येथून निघून जा. फिर्यादीने आरोपी शेख उजेर शेख अमीन यास विरोध केला. मात्र, त्याने पहिल्या पत्नीला ठेऊन घेतले आणि फिर्यादीला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पीडितेने सिटीचौक पोलीसस्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शेख उजेर शेख अमीनसह सासू, सासरे, सवतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.