Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारींच्या त्या वक्तव्यावर राजे संतापले, उदयनराजेंनी राज्यपालांची थेट लायकीचं काढली तर संभाजीराजेंकडून माफीनाम्याची मागणी

ऐवढचं नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या महाराष्ट्राबाहेर हकालपट्टीची मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

PC- Facebook

राज्यात गेले दोन दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अपमानाचा मुद्दा चांगला रंगला आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली असुन शिवभक्तांकडून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा मोठा विरोध होताना दिसत आहे.  तरी आता छत्रपती घराण्याकडून देखील या वादावर तीव्र प्रतिक्रीया देण्यात आली आहे. उदयनराजे भोसलेंनी तर छत्रपती शिवाजी महाराजां विरोधीत बोलणाऱ्यांची लायकीचं काढली आहे. तर दुसऱ्याबाजूला संभाजीराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना ही माफी मागावी लावावी असं घणाघात छत्रपती संभाजी राजेंनी केला आहे. ऐवढचं नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या महाराष्ट्राबाहेर हकालपट्टीची मागणी संभाजी राजेंनी केली आहे.

 

छत्रपती शिवरायांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) आणि महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्ये करतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) त्यांची पाठराखण करतात, हे कोडं आहे. ते त्यांची बाजू का घेतात? असा सवाल उपस्थित करत छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (DCM Devendra Fadnavis) देखील निशाणा साधला आहे. (हे ही वाचा:- Shiv Sena On Bhagat Singh Koshyari: शिवरायांचा अपमान करणार्‍यांनी महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, शिवसेनेचं मुखपत्र सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार)

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यात गदारोळ माजला आहे. विरोधकांकडून  राज्यपाल कोश्यारींसह भाजप आणि शिंदे गटावर मोठी टीका होत आहे. तसेच शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचं वक्तव्य भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी केलं आहे. राज्यतील राजकारण या वक्तव्यावरुन चांगलचं तापलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif