Shocking news: शाळेत शिकत असताना चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक घटनेतून मुलीसोबत बॉयफ्रेंडला घातल्या बेड्या
एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे.
Shocking news: छत्रपती संभाजीनगर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार (Child Molestation) झाल्याचे उघडकीस आले आहे. पालकांनी शाळेतील एका शिक्षकेवर या संदर्भात आरोप केला आहे. पोलिसांनी या शिक्षकेसोबत तिच्या बॉयफ्रेंडला सुध्दा अटक करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुडलिंकनगर परिसरात घडला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलींच्या सुरक्षितेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
काही दिवसांपासून चिमुकलीवर महिला शिक्षकेने आणि बॉयफ्रेंडने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीला काही दिवसांपासून बर नसल्याने तीला पालकांनी डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. डॉक्टरांनी मुलीच्या गुप्तांगावर जखमेचे व्रण झाल्याचे सांगितले. तीच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे समोर आले. पालकांना तिच्याबद्दल धक्काच बसला. पालकांनी पोलिसांत तक्रार केली. वर्ग शिक्षिका मारहाण करते असा आरोप पीडित चिमुकलीने केला आहे. तिला एका खोलीत बंद करून ठेवल्याचे धक्कादायक प्रकार सांगितला. त्यामुळे पालकांना आणखी भिती वाटू लागली आहे.
पीडित चिमुकली सिनीयर केजीमध्ये शिकत आहे. वर्गशिक्षिका असलेली मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत मारहाण करते आणि त्याच्यासोबत तिला एका खोलीत बंद करून ठेवते असंही चिमुकलीने सांगितलं. पालकांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या संदर्भात नोंद घेतली. पोलिसांनी त्या शिक्षक महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. शिक्षकांने हे प्रकार न घडल्याचं पोलिसात सांगितले. त्यांच्याविरोधात लैंगिंक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार घडताच स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.