Chhatrapati Sambhaji Nagar News: लग्नाच्या तयारीसाठी उधारीचे पैसे मागितले, भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संभाजीनगर हादरलं
लग्नाच्या तयारीसाठी उधारीचे पैसे मागितले. भररस्त्यात तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
Firing News: संभाजीनगर शहरात दिवसाढवळा रेकॉर्डवर असलेल्या गुंड्यानी एक तरुणाची गोळी झाडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. अवघ्या 7,500 रुपयांच्या वादामुळे तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येत एका आणखी तरुणाला गंभीर जखम झाल्याचे समोर येत आहे. उधारिचे साडेसात हजार रुपये मागितल्याने तरुणाला भररस्त्यात गोळी झाडली. या हल्लेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे 11 दिवसांनी लग्न होणार होते. शहरातील बायजीपूर भागात ही घटना घडली.
लग्नाच्या तयारी साठी उधारीचे पैसे मागितल्याने हत्या करण्यात आली. हमद अब्दुल्लाह सालेह कुतुब चाऊस (वय 24 वर्षे) असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फय्याज पटेल (वय 27 वर्षे) असं गोळी झाडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २० ऑगस्ट रोजी हमदचे लग्न होणार होते. त्यासाठी तो तयारी करत होता. तयारीसाठी उधारीचे पैसे मागण्यासाठी त्याने काही दिवसांपुर्वी फय्यादकडे विनवणी केली. त्याने पैसे न देता त्याची हत्या केली. हमद आणि त्याची आई हे दोघेंही शहरात राहत होते.
फय्यादने मौका बघून हमदवर हल्ला केला. पहिली गोळी हमदवर झाडताना नेम चुकला आणि जवळील एका स्टोर मधील एका व्यक्तीच्या हाताला लागली. त्यानंतर हमदवर दुसरी गोळी झाडली आणि ती थेट छातीला लागली. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. शहरात पुन्हा नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे.
उधारीची पैसे मागितल्याने गोळ्या घालून हत्या, औरंगाबाद गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा हादरले@abpmajhatv pic.twitter.com/tExoLnBbav
— Mosin Shaikh (@mosinKS) August 10, 2023
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

