Rape Case: चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, आरोपी तासाभरात पोलीसांच्या ताब्यात

अवघ्या चार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे,

Raped (representationla image)

Rape Case: औरंगाबादच्या वाळूज (Waluj) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंदिरातून घराकडे निघालेल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १७ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे.   याप्रकरणी वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांना या घटनेची आहे.  पोलिसांनी या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चिमुकलीचे घर पंढरपूर येथील एका मंदिराच्या पाठीमागेच आहे. 17 ऑगस्टच्या मंदिरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंदिरात दररोज हरिपाठ असतो. सांयकाळी मंदिरात हरिपाठ चालू असतना ती मंदिरात धिंगाणा करीत असल्याने तिच्या बहिणीने तिला घरी पाठवून दिले. ती मंदिराच्या बाहेर पडताच संभाजी धवारे नावाच्या व्यक्तीने तीला घेरले. अंधार असल्यामुळे त्या आरोपीने मुलीचा अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला.

तिच्यावर अत्याचार करून तीला सोडून दिलं. मुलीने घरी येवून संपुर्ण घटना कुटूंबियांना सांगितली. तीला वेदना होत असल्याचे रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. कुटूंबियांनी पोलीसांत तक्रार केली. पोलीसांनी तीची विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला.  वाळूज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून आरोपीला तासाभरात पोलीसांनी पकडले.  पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif