Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागात 24 वर्षीय तरूणावर 4 वेळा कार घालत घेतला जीव
वाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत
बहिणीच्या लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून एका भावाने 24 वर्षीय मुलाची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल चार वेळा बोलेरो कार अंगावर घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शेंदुरवादा-सावखेडा महामार्गावरील आहे. या मध्ये मृत पावलेल्या तरूणाचे नाव पवन लोढे आहे. दुर्दैवी बाब म्हणजे पवनचा मृत्यू त्याच्या मृत्यूच्या आठवडाभर आधी झाला आहे. त्यामुळे लग्नघर असलेल्या घरात नवरदेवाच्या मृत्यूच्या बातमीने टाहो फोडला जात आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी पवन आपल्या दुचाकी वरून पैसे काढायला गेला होता. त्याच्या दुचाकीला बोलेरो च्या मदतीने धडक देण्यात आली. पवन खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो घालण्यात आली. आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी पवनने मदत केली होती. त्याचा राग मनात ठेवत त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.