Crime News: दहा रुपयाच्या वादात निर्घूण हत्या, हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यात, धक्कादायक घटनेमुळे संभाजीनगर हादरलं

छत्रपतीसंभाजी नगर येथे दहा रुपयांत दारू मिळते का यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादात मुलाने व्यक्तीचा खून केला.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Crime News:  संभाजीनगर  येथे दारू पिण्यासाठी दहा रुपये देण्यावरून वाद निर्माण झाला आणि या वादात दारूड्या तरुणाचा खून (Murder) करण्यात आला आहे. या घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पुंडलिकनगर मध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी  11 वाजता घडली. खून केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि पोलीसांना संपुर्ण घटना सांगितली. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. डोक्यावर जब्बर मार लागल्यामुळे मरण पावला. रात्रीच्या वेळीस दोघेही बार मध्ये बसले होते तेव्हा त्यांच्या वाद झाला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहीत चौधरी वय वर्ष 11 बार मध्ये दोघेही सोबत बसले होते. पुंडलिकनगर रस्त्यावरील दौलत बंगल्यासमोर रात्री 11 वाजता बसले होते. दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. 'दहा रुपयांमध्ये दारू मिळते का?' यावरून वाद सुरु होता. वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. हाणामारीत आरोपी रोहितने तरुणाला जबर मारहाण केली. बाजूलाच असलेल्या हत्याराने रोहीतने दारुड्या तरुणावर हल्ला केला. डोक्याला जब्बर मार लागल्यामुळे तो जागेवर बेहोश झाला. जखमा गंभीर असल्यामुळे त्याचा जागीच श्वास सोडला.

आरोपी त्यानंतर  स्वतः जवळच्या पोलीस ठाण्यात गेला. आणि संपुर्ण घटना सांगितली. त्याने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतले यावेळी त्यांना त्या ठिकाणी मृतदेह दिसला. त्याला तातडीने मृतदेह ताब्यात घेवून दवाखान्यात भरती करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक राजश्री आडे, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement