Chhath Puja in Pune and Pimpri Chinchwad: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई, महापालिकेचा निर्णय
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) भीषण विषाणूने संपूर्ण देशाला ग्रासले असल्यामुळे यंदा संपूर्ण देशात कोणतेही सण-उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरे करण्यात आले नाही. सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) भान राखत लोकांनी घरात राहून आपल्या कुटूंबासह आपले सण साजरे केलेत. त्यात सध्या सुरु असलेल्या बिहारी लोकांच्या छठपूजा (Chhath Puja) सणावर देखील सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यात मुंबईत अनेक ठिकाणी विशेषत: समुद्र किना-यावर छठपूजेस मनाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही (Pune And Pimpri Chinchwad) सार्वजनिक ठिकाणी छठपूजा साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
याआधी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या राज्यात छठपूजेवर मनाई करण्यात आली होती. यात झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीसा, दिल्ली अशा राज्यांत सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही छठपूजेवर मनाई करण्यात आली आहे. हेदेखील वाचा- Chhat Puja in Mumbai: मुंबईत छठ पूजेसाठी 'या' ठिकाणांवर BMC कडून बंदी
कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. छटपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतिषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल. असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.