छगन भुजबळ यांना शिवसेनेत एन्ट्री नाही, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

परंतु छगन भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेशावर कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य-File Image)

राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. परंतु छगन भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेशावर कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे या चर्चेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठे विधान केले आहे. तर भुजबळांना पक्षात एन्ट्री नाही असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शनिवारी मातोश्रीवर नाशिकमधील पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची एक बैठक पार पडली. त्यावेळीच भुजबळ यांना पक्षात स्थान मिळणार नसल्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. तसेच भुजबळ पक्षात आल्यास काय होऊ शकते किंवा नाही या मुद्दावर सुद्धा चर्चा झाली. तेव्हा शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या पक्षप्रवेशावर तीव्र विरोध दर्शवला. एवढेच नाही बाळासाहेबांना त्यांनी दिलेला त्रास अद्याप विसरलो नाही असल्याचे ही कार्यकर्त्यांनी त्यावेळी म्हटले.

(कट्टर शिवसैनिकाचा छगन भुजबळ यांना इशारा 'लखोबा लोखंडे, साहेबांना दिलेला त्रास जनता विसरणार नाही, आहे तिथेच राहा')

त्यामुळे आता भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बाळासाहेबांना भुजबळ यांनी दिलेल्या त्रासाचा विसर न पडल्याचे ही मत व्यक्त केले. तर काही दिवसांपूर्वी कट्टर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात पोस्टर झळकावले होते.