Mumbai Crime: रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल

पण काही तरुणाई याकडे लगेच आकर्षित होते. अशीच एक घटना मुंबई येथे घडली आहे. परिक्षेचे निकालासाठी इन्स्टाग्रामच्या रीलवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले आहे.

Instagram (PC - pixabay)

Mumbai Crime: अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रिल्स या फसवणूक करणाऱ्या असतात. पण काही तरुणाई याकडे लगेच आकर्षित होते. अशीच एक घटना मुंबई येथे घडली आहे. परिक्षेचे निकालासाठी इन्स्टाग्रामच्या रीलवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले आहे. स्कॅमरने एका रिलच्या मार्फत आयईएलटीएस परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचा दावा करणारा रिल पोस्ट केला होता. या रिल्सवर विश्वास ठेवून तरुणाने बॅंक खात्यातील दोन लाख रुपये गमावले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुंबईतील डोंगरी येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत काम करते. पीडितेला परदेशात एमबीए करायचे होते. तिने गेल्या वर्षी आयईएलटीएसची परीक्षाही दिली होती. मात्र, परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले. 28 ऑगस्ट रोजी, पीडिता त्याच्या फोनवर इंस्टाग्राम रील्स पाहत असताना त्याला आयईएलटीएस परीक्षेत चांगले गुण देण्याचा दावा करणारा एक रील आला. या रिल्सच्या भोवऱ्यात अडकून तरुणाने रिल्स पोस्ट करणाऱ्या स्कॅमर्सी संपर्क साधला.

स्कॅमर्सने ज्या ठिकाणी आयईएलटीएसचे निकाल पाठवले जातात त्या ठिकाणी त्याचे लोक असल्याचे पीडितेला सांगितले. त्यानंतर काम करुन देण्यासाठी पैशांची मागणी केली. पीडितेने स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत, २.१८ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्याने आणखी पैश्यांची मागणी केली. परंतु पीडितेने पैसे देण्यास नकार दिला. पैसे भरूनही पीडितेचे काम पुर्ण झाले नाही त्यामुळे त्याने चिंता व्यक्त केली. डोंगरी पोलिसांनी भारतीय न्या संहितेच्या कलम 318 आणि 66 या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif