IPL Auction 2025 Live

New Mumbai: रेल्वेत नोकरीच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

ही तक्रार CBD पोलिस स्टेशनला हलवण्यात आली, जिथे बुधवारी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representational Image (File Photo)

New Mumbai: नवी मुंबई येथून फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे. भारतीय रेल्वेत (Indian Railway) नोकरी (Job) लावण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याकडून 25 हजार रुपये घेतले. या फसवणुकीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी (New Mumbai Police) डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली.

जळगाव येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यक्तीने गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील त्याच्या क्लिनिकमध्ये डॉक्टरांना 25 हजार रुपये दिले होते, असे सीबीडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. या व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच पैसे दिल्यानंतर शेतकऱ्याला बनावट नियुक्ती पत्रही देण्यात आले. (हेही वाचा -Online Fraud Helpline Number: तुम्ही ऑनलाइन फसवणुकीचे बळी पडला आहात का? या नंबरवर कॉल करून तुम्हाला परत मिळतील पूर्ण पैसे)

याबाबत शेतकऱ्याने शासकीय रेल्वे पोलिसांकडे इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार CBD पोलिस स्टेशनला हलवण्यात आली, जिथे बुधवारी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (वाचा - Cyber Fraud in Pune: अमेझॉनच्या नावे ऑनलाईन टास्क करण्याच्या नादात प्रोफेसरने गमावले 21 लाख; तपास सुरू)

नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचे हे पहिलेचं प्रकरण नाही. यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. अशा स्वरुपाच्या घटना उघकीस येऊन देखील लोक नोकरीच्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे कोणत्याही अधिकृत पदभरती शिवाय अशा स्वरुपाच्या जाहिरातींना बळी पडू नका.