मुंबईमध्ये 'शाम ए गरीबा' मोहरम मिरवणुकीदरम्यान वाहतूक मार्गात बदल
त्यात साधारण १ ते १.५ लाख मुस्लिम बांधव सहभाही होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहरम निमित्त 'शाम ए गरीबा' ही मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला होणारी गर्दी विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. पोलिसांनी ट्विटरद्वारे प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही मिरवणूक आज (२० सप्टेंबर) सायंकाळी ४ च्या सुमारास निघणार आहे. त्यात साधारण १ ते १.५ लाख मुस्लिम बांधव सहभाही होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घ्या : मोहरम का आणि कसा साजरा केला जातो ?
दरम्यान, ही मिरवणूक मोहरमच्या १०व्या दिवसानिमित्त काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्ग जैनबिया हॉल, पाकमोडिया स्ट्रीट येथून याकुब स्ट्रिट इब्राहिम रहिमतुल्ला रोड, जे. जे. जंक्शन, जे. जे. पोलीस ठाण्यासमोरुन, नेसबीट मार्गे माझगांव येथे रहिमताबाद कब्रस्थान भायखला या ठिकाणी जाऊन समाप्त होणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीचा दुपारी ३ ते रात्री १२ या कालावधीत शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. ही शक्यता विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने शहरात काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरता बदल केला आहे. तर, काही ठिकाणी वाहतूक इतर मार्गावरुन वळवली आहे.
वाहतूक मार्गात होणारा बदल
- मिरवणूक सुरु होण्याच्या आर्धा तास आगोदरपासून चकाला जंक्शनवरील वाहतूक कर्नाक बंदर ब्रिज मार्गे पी डिमेलो रोडवरु पुढे सरकेल.
- दोन टाकीकडून मौलाना शौकत अली मार्गे सर जे. जे. जंक्शनकडे येणारी वाहतूक, दोन टाकी जंक्शन वरून मौलाना आझाद रोड (दक्षिण) व डंकन रोडकडे पाठवण्यात येईल.
- गोल देऊळपासून एस. व्ही. पी. रोड ते भेंडीबाजार जंक्शनकडे जाणारी वाहतूक बापू खोटे स्ट्रिटकडे वळविण्यात येणार आहे.
- अब्दुल रेहमान स्ट्रिट व बापू खोटे ट्रिटवरून येमारी वाहतूक पायधुनी जंक्शन येथून काळबादेवी रोडमार्गे वर्धमान चौकाकडे पाठविण्यात येणार आहे.
- वर्धमाने चौकातून काळबादेवी रोड मार्गे पायधुनी जंक्शनकडे येणाऱ्या सर्व बेस्ट बसेस वर्धमान चौकामध्ये उजवे वळण घेून एल.टी. मार्ग मार्गे सी.एस.टी जंक्शनकडून पी. डिमेलो रोडवरून पाठविण्यात येईल.
- भायखळा वाहतूक विभाग हद्दीदतील बी.ए. रोडने लालबाग ब्रिजवरून येणारी सर्व वाहने खडा पारशी जंक्शन येथे उजवे वळण घेऊन क्लेअर रोड, नागपाडा जंक्शन, मौलाना आझाद रोड, बापू खोटे स्ट्रीट, पायधुनी जंक्शन, काळबादेवी रोड मार्गे वर्धमना चौकाकडे पाठविण्यात येईल.
- एक दिशा पश्चिम पूर्व वाहतुकीसाठी खुला असलेला सोफिया झुबेर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहिल.
- बलवंत सिंग दोधी मार्गावरुन सेंट मेरी स्कूलकडून नेसबीट जंक्शनवर येणारी फक्त जड मालवाहतूक वाहने नेसबीट वरुन दक्षिणेकडे जाऊ इच्छितात, त्यांना उजवे वळण देऊन खडा पारसी जंक्शनकडे वळविण्यात येतील.
- पायधुनी जंक्शन वरुन आय. आर. रोडवरुन येणारी वाहतुक ही मांडवी जंक्शन या ठिकाणावरुन उजवे वळण देऊन मोहम्मद अली रोडकडे पाठविण्यात येईल.
- नूरबागकडून जे.जे. जंक्शनकडे कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. नूरबाग जंक्शन येथे डावे वळण घेऊन डॉ. मशेरी रोडने वाडीबंदर ब्रिजवरुन पी. डिमेलो रोडला पाठविण्यात येतील.
- सर जे.जे. उड्डानपूर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेहमीप्रमणे खुला राहिली.