चंद्रपूर: भाविकांच्या वाहनाला अपघात, 6 ठार, 6 जखमी; मूल तालुक्यातील केसलाघाट येथील घटना
तर, मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दोन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्वजण हे चंद्रपूर येथील बाबूपेठ परिसरातील भोयर आणि पाटील कुटुंबाचे सदस्य आहेत. हे सर्वजण गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला.
देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 6 जण ठार तर, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मूल (Mul Taluka) तालुक्यात असलेल्या केसलाघाट (Kesla Ghat) येथे ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सर्व मृत हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, रेखा खटिकर अशी स्कॉर्पिओतील काहींची नावे आहेत. उर्वरीत लोकांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांमध्ये पाच महिला आणि चालकाचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दोन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्वजण हे चंद्रपूर येथील बाबूपेठ परिसरातील भोयर आणि पाटील कुटुंबाचे सदस्य आहेत. हे सर्वजण गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला.
अपघाताबाबत माहिती अशी की, पाटील आणि भोयर कुटुंबीय स्कार्पिओ (एमएच 34एबी 9786) या गाडीने देवदर्शनासाठी गेले होते. दिवसभर देवदर्शन करुन हे भावीक परतत होते. दरम्यान, केसलाघाट ते नागाळा दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच 34 एपी 2533) त्यांच्या स्कार्पिओने धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, आर्धी स्कार्पिओ ट्रकमध्ये घुसली होती. (हेही वाचा, मुंबई: फोनवर गप्पा मारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या; पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पतीची कबुली)
एएनआय ट्विट
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यातील काहींनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. दरम्यान, पोलिसांनाही घटनेची माहिती कळाली. जखमींना प्राथमिक उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात. मात्र, जखमींची प्रकृती अधिक प्रमाणात खालावत जाऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु आहे.