चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर (Chandrapur) येथे रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा (Goat) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

चंद्रपूर (Chandrapur) येथे रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा (Goat) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बकरी मालकाचे जवळजवळ लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

राजुरा येथील बल्लापूर मार्गावर आज सकाळी जवळजवळ 150 बकऱ्या रेल्वे रुळांजवळील एका शेतात घेऊन जाण्यात आल्या होत्या. मात्र अचानक बकऱ्यांचा कळप रेल्वेच्या दिशेने पळत सुटला. त्याचवेळी समोर येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एकाचवेळी सर्व बकऱ्यांचा मृत्यू झाला.(रत्नागिरी येथील आंबेनळी घाटात 800 फूट दरीत ट्रक कोसळला)

तर 100 बकऱ्या-मेंढ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत बकरी मालकाचे तब्बल 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नुकसान भरपाईसाठी आता मागणी केली जात आहे.