Chandrapur Lighting News: वीज कोसळल्यामुळे सहा जणांचा बळी,चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ

परिसरात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Lightning (PC - Instagram)

 Chandrapur Lighting News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) धुमाकुळ घातला. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने कहर केला आहे. राज्यात मुसळधार पावसाने काही भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. आणि सखल भागात पाणी भरले आहे. दरम्यान काही ठिकाणी मेजगर्जनेसह पाऊस चालू आहे. वीजाच्या कडकडाटासह चंद्रपूरमध्ये (Chnadrapur) मुसळधार पाऊस सूरू आहे. दरम्यान चंद्रपूर येथे वीज पडल्यामुळे वेगवेगळ्या घटनेमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सतत मुसळधार पावसामुळे जिल्ह्याता रेड अर्लट जारी केला आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गीता ढोंगे, कल्पना झोडे, अंजना पूसतोडे, पुरुषोत्तम परचाके, गोविंदा टेकाम, अर्चना मडावी असे वीज पाडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टी असल्यामुळे हवामान खात्याने जिल्ह्यात रेड अर्लट जारी केला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातले आहे. वीज पडल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने जिल्ह्यात सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे.  गीता ढोंगे (वय ४५) या शेतातून परत येत असतांना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे घडली. येथे शेतात रोवणीचे काम करत असणाऱ्या कल्पना झोडे आणि अंजना पूसतोडे या दोन महिलांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके  शेतात फवारणी करत असतांना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाचे कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. पोंभूरणा तालुक्यात देखील अर्चना मडावी (वय २८) या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.