Chandrapur Food Poison: चंद्रपूरमध्ये 41 प्रशिक्षणार्थी पोलीसांना विषबाधा, 9 जण गंभीर, उपचार सुरु
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याची घटना घडल्या आहे.
Chandrapur Food Poison: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याची घटना घडल्या आहे. दरम्यान काल नागपूरमध्ये सिघांड्याचे पीठ खावून अनेकजण आजारी पडले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा चंद्रपूरात 41 प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. त्यांना तात्काळा प्रशिक्षणार्थींवर वैद्यकिय महाविद्यालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा- अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आश्रम शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरातील प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना कॅटींनच्या जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना तात्काळ वैद्यकिय उपचार देण्यात आले आहे. दरम्यान काही कर्मचाऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आले आहे. तर ९ पोलिस कर्मचाऱ्यांची तब्येत गंभीर आहे अशी माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान त्यांना विषबाधा कशातून झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. महाशिवरात्री निमित्त अनेकांचे उपवास होते. तर कॅंटीनमध्ये चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे ते आजारी पडले अशी माहिती सांगण्यात आली आहे.
कॅंटीगचे जेवण झाल्यानंतर काही जणांना मळमळ आणि उलट्या झाल्याच्या तक्रार केल्या. त्यानंतर ४१ प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ९ जणांची तब्बेत गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची दखल पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घेतली. जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रुग्णालयात ९ जणांवर उपचार सुरु आहे. दरम्यान चंद्रपूरात ऊन असल्यामुळे डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार वाढत चालला आहे त्यामुळे देखील होऊ शकतं असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.