Chandrapur: वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री पीक राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या मानेकडच्या भागाची वाघाने चिरफाड केली आहे.

देवराज जीवतोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. देवराज हे रात्री शेतात पिक राखणीसाठी गेले होते. तर रात्रभर ते शेतातील मचाणीवर बसून पिकाची राखण करत होते. मात्र सकाळी घरी जाण्यासाठी खाली उतरले तेव्हा लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या या हल्ल्यामध्ये देवराज गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला आहे.(हेही वाचा - Pavna Dam: मच्छिमाराला धरणात सापडला सुसरीसारखा अवाढव्य विषारी मासा)

या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चंद्रपूर, यवतमाळ येथे सध्या वाघांची दहशत खूप वाढली आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास 15 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Pune New Year Party Invite: काय सांगता? पुण्यात पबने नवीन वर्षाच्या पार्टी निमंत्रणासोबत ग्राहकांना पाठवले Condoms; काँग्रेसने दाखल केली तक्रार

Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध; फर्ग्युसन कॉलेज रोड, एम.जी. रोड असेल 'नो व्हेईकल झोन'

New Year 2025 Celebrations in Mumbai: मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला BEST चालवणार हेरिटेज टूर आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बसेस; जाणून घ्या सविस्तर

Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले