IPL Auction 2025 Live

Shiv Sena-BJP: ठाकरे-मोदी भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेला ऑफर 'आम्ही कधीही तयार आहोत'

आमची दुश्मणी कधीच नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमत नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. का ते माहिती नाही. पण आम्ही वाघासोबत दोस्ती करण्यासाठी कधीही तयार आहोत.

Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नुकीतच एक भेट झाली. या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक विधान करुन संभ्रम आणखी वाढवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, 'वरीष्ठ नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी अज्ञा. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जर इच्छा व्यक्त केली तर आम्ही केव्हाही तयार आहोत. वाघाशी दोस्ती करण्यासाठी. खरे तर वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती' अशी पुस्तीही पाटील यांनी जोडली. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) भाजप संभाव्य युतीबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे. ते पुणे (Pune) येथे बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, वाघासोबत आमची दोस्ती आहेच. आमची दुश्मणी कधीच नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमत नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. का ते माहिती नाही. पण आम्ही वाघासोबत दोस्ती करण्यासाठी कधीही तयार आहोत. चंद्रकांत पाटील यांना वन्यजीव अभ्यासक अनुज खरे यांनी वाघाची एक प्रतिकृती भेट दिली. त्यावरुन संदर्भ घेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. (हेही वाचा, 'मी कोणत्या नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो'; पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर CM Uddhav Thackeray यांची प्रतिक्रिया)

व्हिडिओ

चंद्रकांत पाटील म्हणाले, वाघासोबत दोस्ती व्हावी म्हणून आपण वाघ भेट दिलात. पण आमची वाघाशी कधीच दुश्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोस्ती आहे. त्यांचं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी पटत नाही. का ते माहिती नाही. पण दोस्ती असती तर याआधी 18 महिन्यांपूर्वीच सरकार येऊ शकलं असतं. मोजींनी आज्ञा दिली ती पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते करु. पण जही उद्या भाजप-शिवसेना सरकार आलं. ज्याची आपण नेहमी चर्चा करता आहात. तरीसुद्धा भविष्यात निवडणुका मात्र वेगवेगळ्याच लढल्या जातील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.