मेगा भरती फेल; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा 'भाजप मुक्त'

त्यामुळे मेगाभरती फेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त झाला अशी चर्चा आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Chandrakant Patil |(Photo Credit: Archived, edited, representative images)

विधानसभा निवडणुकीच्या 'तोंडावर या रे या सारे या' या धर्तीवर भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश घडवून आणले. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाही याला अपवाद नव्हता. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिग्गजांचे भाजप प्रवेश झाले. मात्र, ही मेगाभरती विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या कामी आली नाही. उलट त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त (BJP Free Kolhapur) होण्यात झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, करवीर, कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, चंदगड, राधानगरी , शिरोळ, हातकणंगले या नऊ मतदारसंघातील एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मेगाभरती फेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त झाला अशी चर्चा आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणूक 2014 मध्ये मिलालेल्या अभूतपूर्व यशानंतर जिल्ह्यात स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली. त्यासाठी केंद्र आणि राज्या प्रमाणे जिल्ह्यातही आखणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजप प्रवेश घडले. त्याच्या जोरावर जिल्हा परिशदा, पंचायत समित्या, यांत भाजपला यश मिळालेही. पण या यशाचे सातत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राखता आले नाही. (हेही वाचा, शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशात महत्त्वाचा सहभाग असलेले दोन 'अमोल' )

खरे तर युतीच्या जागावाटपात इथे फारसे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले नव्हते. पण, हक्काचे समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदार संघात भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाल्याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही मतदारसंघात युतीत बंडखोरी झाल्याने भाजपला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत आता पुन्हा कमळ फुलवायचे असेल तर, भाजपला नव्याने सुरुवात करावे लागणार आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजप मित्रपक्ष शिवसेनेलाही कोल्हापूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातही युतीत बंडखोरी झाली. परिणामी या जिल्ह्यात कागल, चंदगड, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी या चार मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif