Chalo App: मुंबईमध्ये आता अवघ्या 1 रुपयात एसी-नॉन एसी बसने करू शकता पाच ट्रिप्स; BEST ची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

या सुविधेचा लाभ यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत घेता येणार आहे.

BEST bus (Photo Credits: PTI)

‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी आणि जनतेमध्ये चलो अॅप (Chalo App) लोकप्रिय करण्यासाठी, बेस्टने अवघ्या 1 रुपयात पाच ट्रिप्स घेण्याची आकर्षक योजना सुरू केली आहे. चलो अॅपच्या नवीन वापरकर्त्यांसाठी ही एक-वेळ योजना उपलब्ध आहे. 7 दिवसांच्या कालावधीत, लाभार्थी कोणत्याही मार्गावर बेस्ट बसमधून प्रवास करू शकतात. ही ऑफर यावर्षी 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरबद्दल माहिती देताना वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘आझादी का अमृत महोत्सव' आणि अंडरटेकिंगच्या नगरपालिकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीचा एक भाग म्हणून, बेस्टने 1 रुपयांची योजना जाहीर केली आहे.

ऑफरबद्दल अधिकाऱ्याने सांगितले, नवीन चलो वापरकर्ते 1 रुपयाचा पास डाउनलोड करू शकतात, ज्यामध्ये एसी किंवा नॉन एसी बसमध्ये कोणत्याही लांबीच्या पाच फेऱ्या करता येतील. डिजिटलायझेशनचा एक भाग म्हणून, बेस्टने काही महिन्यांपूर्वी डिजिटल तिकीट सुरू केले. चलो अॅप व्यतिरिक्त, तिकीट आणि पासच्या आभासी खरेदीसाठी चलो एनसीएमसी कार्ड देखील लाँच करण्यात आले आहेत, जो राष्ट्रीय स्तरावरील पहिलाच उपक्रम आहे. (हेही वाचा: दिलासादायक! माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत)

सध्या 33 लाख दैनंदिन प्रवाशांपैकी 22 लाख चलो अॅप वापरत आहेत आणि 3.5 लाख डिजिटल तिकीट सुविधा वापरत आहेत. बेस्टचा आणखी एक उपक्रम-- डिजिटल बसलादेखील आजकाल खूप मागणी आहे. बेस्ट टॅप-इन आणि टॅप-आउट सुविधा असलेल्या 100 हून अधिक डिजिटल बस चालवते. तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याने प्रवाशांना ते सोयीचे वाटत आहे.

त्याचप्रमाणे, ज्या लोकांना स्मार्ट कार्ड किंवा NCMC कार्ड वापरायचे आहेत अशा प्रवाशांना 20 रुपयांची सूट दिली जाते. या सुविधेचा लाभ यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत घेता येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif