Kalyan येथे चादर गँगचा धुमाकुळ, दुकानादारांना लाख रुपयांचा गंडा

Kalyan येथे चादर गँगने धुमाकुळ घातली असून दुकानातून लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच चोरट्यांनी केलेली ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Kalyan येथे चादर गँगचा धुमाकुळ, दुकानादारांना लाख रुपयांचा गंडा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Kalyan येथे चादर गँगने धुमाकुळ घातली असून दुकानातून लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच चोरट्यांनी केलेली ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चादर गँगने गेल्या काही दिवसात दोन दुकानातून लाखोंचा माल पळवला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चादर गँगने दुकानासमोर येऊन चादर झटकण्याचे नाटक करुन दाखवत. तर बंद असलेल्य दुकानाचे शटर वरती करुन चोरी केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. तसेच दुकानात चोरांच्या साथीमधील एक व्यक्ती दुकानाच्या आतमध्ये जातो आणि दुकानातील सामान लुटुन घेतो. या चोरीमध्ये चोरट्यांनी लॅपटॉप, लाखो रुपयांचे आयफोन पळविले आहेत.

याप्रकरणी कल्याण पोलिसांतर्फे या चादर गँगचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच व्यापाऱ्यांध्ये अशा प्रकरणांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2018 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).