Maharashtra Assembly Elections 2024: मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय! मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 19 व 21 नोव्हेंबर दरम्यान चालवणार विशेष उपनगरीय गाड्या
मध्य रेल्वे 19 आणि 20 नोव्हेंबर 2024 (मंगळवार-बुधवार रात्री) आणि 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 (बुधवार-गुरुवार रात्री) दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे (Central Railway) ने मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे 19 आणि 20 नोव्हेंबर 2024 (मंगळवार-बुधवार रात्री) आणि 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 (बुधवार-गुरुवार रात्री) दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाईन (CSMT-कल्याण) आणि हार्बर लाईन (CSMT-पनवेल) वर चालवल्या जातील.
विशेष उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक -
मंगळवार-बुधवार रात्री (नोव्हेंबर 19-20, 2024)
मुख्य मार्ग (डाउन): सीएसएमटी – कल्याण स्पेशल सीएसएमटी 03:00 वाजता सुटेल आणि 04:30 वाजता कल्याण येथे पोहोचेल. (हेही वाचा -Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत)
मेन लाइन (UP): कल्याण – CSMT स्पेशल कल्याणहून 03:00 वाजता निघेल आणि 04:30 वाजता CSMT ला पोहोचेल.
हार्बर लाईन (डाउन): सीएसएमटी-पनवेल स्पेशल: सीएसएमटी 03:00 वाजता सुटते, 04:20 वाजता पनवेलला पोहोचते.
हार्बर लाइन (अप): पनवेल – सीएसएमटी स्पेशल 2: पनवेलहून 03:00 वाजता निघेल आणि 04:20 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
बुधवार-गुरुवार रात्री (नोव्हेंबर 20-21, 2024)
मुख्य मार्ग (डाउन): सीएसएमटी – कल्याण विशेष: सीएसएमटी 01:10 वाजता सुटेल आमि कल्याण येथे 02:40 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी – कल्याण विशेष: सीएसएमटी 02:30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 04:00 वाजता पोहोचेल.
मुख्य मार्ग (अप): कल्याण – सीएसएमटी स्पेशल: कल्याणहून 1 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 2:30 वाजता पोहोचेल.
कल्याण – CSMT स्पेशल: कल्याणहून 02:00 वाजता निघेल आणि आणि 03:30 वाजता CSMT येथे पोहोचेल.
हार्बर लाईन (डाउन): सीएसएमटी-पनवेल स्पेशल: सीएसएमटी 01:40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 03:00 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी- पनवेल विशेष: सीएसएमटी 02:50 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 04:10 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन (अप): CSMT-पनवेल विशेष: पनवेल 01:00 वाजता निघेल आणि 02:20 वाजता CSMT पोहोचेल.
सीएसएमटी- पनवेल विशेष: पनवेलहून 2:30 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 3:50 वाजता पोहोचेल.
वर सूचीबद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व विशेष गाड्या सीएसएमटी-कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. या विशेष सेवांद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि निवडणूक सहभागींना सेवा देणे हा उद्देश आहे. मध्य रेल्वेचा हा उपक्रम मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.